मुन्ना यादव नागपुरातील फार्म हाऊसवरच, विखे-पाटलांचा गौप्यस्फोट

‘मुन्ना यादवचा नागपूर पोलीस रात्रंदिवस शोध घेत आहेत. तो सापडत नसल्याचे सांगितलं जात आहे. परंतु, हा मुन्ना यादव आजही नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्म हाऊसमध्ये दडून बसला आहे.’

मुन्ना यादव नागपुरातील फार्म हाऊसवरच, विखे-पाटलांचा गौप्यस्फोट

नागपूर : नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातील आरोपी मुन्ना यादव नागपूर पासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसवर दडून बसल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शुक्रवार) सभागृहात केला.

राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना त्यांनी ही माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले की, ‘मुन्ना यादवचा नागपूर पोलीस रात्रंदिवस शोध घेत आहेत. तो सापडत नसल्याचे सांगितलं जात आहे. परंतु, हा मुन्ना यादव आजही नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्म हाऊसमध्ये दडून बसला आहे.’

‘मुन्ना यादव नेमका कुठे आहे, याची माहिती सभागृहात जाहीर झाल्यामुळे तो तिथून फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नागपूरमधील भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांची सखोल चौकशी करावी. मागील आठवडाभरातील त्यांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासावे. पोलिसांना मुन्ना यादवचे धागेदोरे मिळतील.’ असेही त्यांनी सांगितलं.

‘या सरकारने क्षुल्लक राजकीय हेतूसाठी गुंडांना पाठीशी घालण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे समाजात ‘मुन्ना यादव’ निर्माण होऊ लागले आहेत. नागपूर पोलिसांना मुन्ना यादव सापडत नसेल तर त्यांनी त्याला फरार घोषित करावे. त्याला पकडण्यासाठी ५० हजारांचे बक्षीस जाहीर करावे. बक्षीसाची रक्कम द्यायला आपण तयार आहोत.’ असंही विखे-पाटील यावेळी म्हणाले.

मुन्ना यादवविरूद्ध कारवाई करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम त्याला इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावे, अशीही मागणीही विखे-पाटील यांनी केली.

... तर मुंबई पोलिस मुन्ना यादवला अटक करतील : माथुरदरम्यान, याच मुन्ना यादव प्रकरणावरुन पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी नागपूर पोलिसांना काही दिवसांपूर्वी सुनावलं होतं.  ‘जर नागपूर पोलिस शोधू शकत नसतील, तर त्यांनी मुंबई पोलिसांना सांगावं, आम्ही मुंबईत त्याला अटक करु.’ असं ते म्हणाले  होते. मात्र, त्यांच्या या बोलण्याचा देखील नागपूर पोलिसांवर परिणाम झालेला नाही. कारण अद्यापही मुन्ना यादवला शोधण्यात नागपूर पोलिसांना यश आलेलं नाही.

संबंधित बातम्या :

नागपूर पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना!

नागपुरातील भाजप नेते मुन्ना यादव यांची CID चौकशी सुरु

स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत धिंगाणा, मुन्ना यादवांच्या मुलांवर गुन्हा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Munna Yadav in Nagpur Vikhe Patil’s information in the Vidhansabha latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV