45 वर्षीय पतीची हत्या, पत्नीचा 20 वर्षीय प्रियकर अटकेत

नागपुरातील 45 वर्षीय इसमाच्या हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. मनोज लोणकरच्या विभक्त पत्नीच्या 20 वर्षीय प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

45 वर्षीय पतीची हत्या, पत्नीचा 20 वर्षीय प्रियकर अटकेत

नागपूर : नागपुरातील 45 वर्षीय इसमाच्या हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. मनोज लोणकरच्या विभक्त पत्नीच्या 20 वर्षीय प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

45 वर्षीय मनोज लोणकर 25 वर्षीय पत्नी सोनूपासून विभक्त राहत होते. रविवारी रात्री ते तिच्या घरी गेले असता दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. याबाबत सोनूच्या प्रियकराला कळल्यानंतर रागाच्या भरात त्यानं मनोजच्या डोक्यात काँक्रिटचा बोल्डर मारला.

हा वार इतका जोरदार होता, की मनोज यांचा जागीच मृत्यू झाला. नागपुरातील विश्वकर्मा नगरात बागडे रुग्णालयासमोर रविवारी रात्री दीडच्या सुमारास मनोज लोणकर यांची हत्या झाली होती. ते एका खाजगी कुरियर कंपनीत कार्यरत होते.

हत्येप्रकरणी पोलिसांनी 20 वर्षीय इशांत मुनघाटेला अटक केली आहे. यामागे सोनूचाही सहभाग आहे का याचा
तपास पोलिस करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV