नागपुरात बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी मुलगी-जावयावर संशय

मानसिंग शिव असं मयताचं नाव असून ते 40 ते 45 वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता आहे.

नागपुरात बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी मुलगी-जावयावर संशय

नागपूर : नागपुरात सूटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मयत व्यक्तीची मुलगी आणि जावई बेपत्ता आहेत.

मानसिंग शिव असं मयताचं नाव असून ते 40 ते 45 वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता आहे. मानसिंग यांची मुलगी आणि जावई बेपत्ता असून परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार त्या दोघांनीच ही हत्या केल्याचा दाट संशय आहे. हत्या प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्यांच्या समावेशाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे ती सूटकेस काल संध्याकाळीच खरेदी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

नागपुरातील माटे चौकात मध्यरात्री 2.30 वाजता एक तरुण आणि तरुणी एक मोठी बॅग घेऊन जात होते. या दोघांनी दुर्गानगर स्टॅण्डवर रिक्षा पकडली आणि चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितलं. परंतु बॅगचं वजन आणि दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रिक्षाचालकाने त्याबाबत विचारणा केली.

बॅगमध्ये पुरुषाचा मृतदेह, रिक्षाचालकाने हटकल्याने तरुण-तरुणी पसार


घाबरल्याने तरुण-तरुणी बॅग तिथेच टाकून माटे चौकातून पोबारा केला. यानंतर रिक्षाचालकाने राणा प्रतापनगर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पहाटे तीनच्या सुमारास पोलिस स्टेशनमध्ये बॅग आणून ती उघडली असता, त्यात पुरुषाचा मृतदेह आढळला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV