कॉल सेंटरमधील तरुणीवर गँगरेप, आरोपींमध्ये तीन तरुणी

पीडिता बेशुद्ध झाल्यावर एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी शुद्धीवर आली तेव्हा गुन्हा दाखल केल्यास ठार मारण्याची धमकी दोघींनी तिला दिली

कॉल सेंटरमधील तरुणीवर गँगरेप, आरोपींमध्ये तीन तरुणी

नागपूर : शीतपेयात गुंगीचं औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. विशेष म्हणजे गँगरेपच्या या प्रकरणात पीडित तरुणीच्या मैत्रिणीदेखील आरोपी आहेत.

निराधार असलेल्या 21 वर्षीय तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आश्रय देण्याच्या बहाण्याने तीन तरुणींनी साथीदाराला तिच्यावर अत्याचार करायला लावल्याची धक्कादायक माहिती आहे. नागपुरातील हुडकेश्वर भागात ही घटना घडली.

या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोन तरुणींना अटक केली आहे. अत्याचार करणारा युवक आणि एक महिला फरार आहे.

पीडित तरुणीला तीन मोठ्या बहिणी आहेत. त्यामुळे आई-वडिलांनी तिच्याकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केलं. कसंबसं तिने बीकॉमचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती एका कॉल सेंटरमध्ये नोकरीला लागली. तिथे तिची ओळख सुप्रियासोबत झाली. ती निराधार असल्याचा गैरफायदा घेत सुप्रियाने पीडित तरुणीला घरी आश्रय दिला.

त्यावेळी सुप्रिया आणि तिची मैत्रिण लीना यांच्या हालचाली पीडित तरुणीला संशयास्पद वाटल्या. ती वेगळे राहण्याच्या विचारात होती.  मात्र 19 सप्टेंबरला दुपारी सुप्रियाने अन्य दोन महिलांच्या मदतीने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून पीडितेला प्यायला दिलं.

पीडिता बेशुद्ध झाल्यावर एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी शुद्धीवर आली तेव्हा गुन्हा दाखल केल्यास ठार मारण्याची धमकी दोघींनी तिला दिली. त्यामुळे काही दिवस ती दहशतीत होती.

अत्याचार करणारा युवक आणि एक महिला फरार आहे. मात्र अत्याचार करणारे एकापेक्षा जास्त होते का, याचा तपासही पोलिस घेत आहेत. या प्रकरणाची कुठली अश्लील चित्रफीत बनवण्यात आली का, याचाही शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV