नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी

नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी

नागपूर : मुंबईपाठोपाठ नागपूरमध्येही लवकरच मेट्रो धावणार आहे. नागपूर मेट्रोचा ट्रायल रन काल शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मिहान डेपो ते एअरपोर्टपर्यंत घेण्यात आला. हा नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन होता.

नागपूरमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचाच ट्रायल रन काल शनिवारी घेण्यात आला. खापरी परिसरातील मिहान डेपोजवळ सुमारे 5 किमीचा हा ट्रायल रन होता. हा इंटर्नल ट्रायल रन असल्यानं त्यात केवळ अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित होते.

नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यात मिहान डेपो ते ऑटोमोटिव्ह चौक मार्गाचं काम वेगानं सुरु आहे. या मार्गाचं काम पूर्णत्वाकडे असून लवकरच नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
स्पेशल रिपोर्ट : नागपूर मेट्रो निर्मितीचा 'जलद ' आणि 'स्वस्त ' प्रवास

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV