खाली-मध्ये गाड्या, वर मेट्रो, नागपुरात डबल डेकर फ्लायओव्हर

सगळ्यात खालचा रस्ता आणि त्यावरील (मध्ये) फ्लायओव्हरवरुन गाड्या धावतील, तर सर्वात वर असलेल्या मार्गावरुन मेट्रो धावणार आहे.

खाली-मध्ये गाड्या, वर मेट्रो, नागपुरात डबल डेकर फ्लायओव्हर

नागपूर : नागपूर मेट्रोचं काम वायूगतीने सुरु आहे. मात्र यातील सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे डबल डेकर फ्लायओव्हर... खापरी ते सीताबर्डी मेट्रो मार्गावर हा डबल डेकर फ्लायओव्हर बांधण्यात येत आहे.

सगळ्यात खालचा रस्ता आणि त्यावरील (मध्ये) फ्लायओव्हरवरुन गाड्या धावतील, तर सर्वात वर असलेल्या मार्गावरुन मेट्रो धावणार आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम एकाच पिलरवर करण्यात येत आहे. अशाप्रकारचा डबल डेकर फ्लायओव्हर मुंबईतही आहे, मात्र तिथे ते वेगवेगळ्या पिलर्सवर बांधण्यात आले आहेत.

जयपूरमध्ये एकाच पिलरवरील डबल डेकर फ्लायओव्हर केवळ एक किलोमीटरचा आहे. नागपूरमध्ये साडेतीन किलोमीटरवर लांबीचा हा डबल डेकर फ्लायओव्हर बांधण्यात येत आहे.

सध्या या फ्लायओव्हरचं काम सुरु असून काही ठिकाणी तो चौपदरी, तर कुठे सहापदरी करण्यात येणार आहे. येत्या मार्चपर्यंत नागपूर मेट्रो तीन स्थानकं, तर नोव्हेंबरपर्यंत खापरी ते सीताबर्डी या मार्गावरील दहा स्थानकांवर ही मेट्रो धावेल, अशी सरकारची महत्त्वाकांक्षा आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nagpur Metro to be run on double Decker flyover latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV