नागपूर पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना!

ऐन दिवाळीत अजनी परिसरात भाजप नेते मुन्ना यादव आणि मंगल यादव यांच्या कार्यकर्त्यात तुंबळ हाणामारी झाली होती.

नागपूर पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना!

नागपूर : राज्य सरकारमध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष असलेले मुन्ना यादव तुम्हाला कुठे दिसले तर नक्की पोलिसांना कळवा. कारण नागपूर पोलिसांना सध्या मन्ना यादव आणि त्याचे सहकारी सापडत नाहीत.

ऐन दिवाळीत अजनी परिसरात भाजप नेते मुन्ना यादव आणि मंगल यादव यांच्या कार्यकर्त्यात तुंबळ हाणामारी झाली होती. लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड्स आणि तलवारीने एकमेकांवर जीवघेणे हल्ले झाले होते. यात दोन्ही गटातील १० लोकं गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. मात्र नागपूर पोलिसांना मुन्ना यादव काही सापडत नाही.

विशेष म्हणजे मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पोलिस हातावर हात ठेवून बसेल नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nagpur police in search of accused Munna Yadav
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV