उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो

वनक्षेत्रात अशाप्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो

नागपूर: उमरेड करांडला अभयारण्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक पर्यटक जीपच्या टपावर बसून वाघाचा फोटो घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

वनक्षेत्रात अशाप्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असं असूनही हा पर्यटक जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो काढत आहे.

वनक्षेत्रात टायगर साइटिंग करताना कुणालाही वाहनाबाहेर निघता येत नाही किंवा शरीराचा एखादा भागही गाडीच्या बाहेर काढता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी वन विभागाची असल्याचं स्पष्ट होतंय.

या पर्यटकाचं हे धाडस त्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं. दरम्यान, वन विभागाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवणाऱ्या या पर्यटकावर कारवाई होणार का, हे पाहणं गरजेचं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nagpur : Umred Karhand: Tiger’s photo from jeep rooftop : Demand action
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV