भरपूर कॉपी, 1000 टक्के पास होणार, पोलिसाकडूनच हमी

आतमध्ये भरपूर चिठ्ठ्या (कॉपी) असल्यामुळे कोणीही नापास होणार नाही, अशी हमी नांदेडमधील परीक्षाकेंद्राबाहेर पोलिस देत आहे.

भरपूर कॉपी, 1000 टक्के पास होणार, पोलिसाकडूनच हमी

नांदेड : परीक्षा सुरु असताना केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ न देण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र नांदेडमध्ये चक्क पोलिसच परीक्षा केंद्रावर कॉपी चालणार, याची एक हजार टक्के गॅरंटी देत आहे.

आतमध्ये भरपूर चिठ्ठ्या (कॉपी) असल्यामुळे कोणीही नापास होणार नाही, अशी हमीसुद्धा पोलिस देत आहे. बारावीच्या परीक्षा सुरु असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. कुंपणच शेत खात असेल, तर नेमकं जायचं कोणाकडे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

श्रीकर परदेशी नांदडेचे जिल्हाधिकारी असताना कॉपीमुक्त जिल्हा म्हणून नांदेडची ओळख होती. पण आता याच भागातल्या परीक्षा केंद्रांची स्थिती बघितली, तर नांदेड जिल्ह्या कॉपीयुक्त होत आहे की काय, असा प्रश्न पडतो.

पाहा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nanded : Cop assures students will pass 1000 percent, since bunch of copies available latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV