नांदेड-मुंबई काही मिनिटांवर, पहिलं विमान झेपावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजनेअंतर्गत या विमानसेवेची घोषणा केली होती.

नांदेड-मुंबई काही मिनिटांवर, पहिलं विमान झेपावणार

नांदेड : बहुप्रतिक्षीत नांदेड-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. टू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरु केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजनेअंतर्गत या विमानसेवेची घोषणा केली होती. मात्र ही सेवा अद्याप सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होती.

नांदेड येथून मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा उपलब्ध असेल. पहिल्या मुंबई-नांदेड विमानाने अभिनेता जितेंद्र, दिग्दर्शक राकेश रोशन, शक्ती कपूर, आदित्य पांचोली नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी येणार आहेत.

नांदेडकरांना यापूर्वी विमानसेवेसाठी औरंगाबादला जावं लागत होतं. प्रसिद्ध गुरुद्वारा दर्शनासाठी देशभरातून भाविक नांदेडला येतात. या विमानसेवेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिर्डी-मुंबई आणि शिर्डी-हैदराबाद विमानसेवेची सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता नांदेडमधूनही विमानसेवा सुरु होत आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हे हळूहळू विमानसेवेने जोडले जात आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nanded Mumbai air service to start from tomorrow
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV