नाफेडचं मूग, उडीद खरेदी केंद्र अचानक बंद, शेतकरी वाऱ्यावर

अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने पीक व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे.

नाफेडचं मूग, उडीद खरेदी केंद्र अचानक बंद, शेतकरी वाऱ्यावर

अमरावती : राज्य सरकारने यंदा उडीद आणि मूग पिकासाठी खरेदी केंद्र सुरु केलं. मात्र नाफेडने हे खरेदी केंद्र कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद केलंय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने पीक व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे.

अमरावती जिल्ह्यात यंदा 35 हजार हेक्टरवर मूग आणि उडीदाची लागवड करण्यात आली होती. मात्र पाऊस मुबलक न झाल्याने उडीद आणि मूगाच्या उत्पादनात घट झाली आहे. साधारणतः एकरी 6 ते 7 क्विंटलचं उत्पादन प्रत्येक वर्षी होतं. पण यंदा बदलत्या वातावरणामुळे ते एकरी दीड क्विंटलवर आलं आहे.

सरकारने नाफेडच्या माध्यमातून प्रती क्विंटल 5 हजार 575 मूगासाठी आणि उडीद खरेदीसाठी 5 हजार 400 रुपयांचा भाव दिला. अमरावती जिल्ह्यात मूग आणि उडीद खरेदीसाठी एकूण 10 केंद्र सुरु करण्यात आले.ऑनलाईन नोंदणीसाठी शेवटची मुदत 10 डिसेंबर ठेवण्यात आली. मात्र नाफेडने कोणतीही पूर्वकल्पना न देता 13 डिसेंबरलाच खरेदी बंद केली.

नाफेडच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तर मनस्ताप होत आहेच, शिवाय ज्यांची नोंदणी झालेली नव्हती, त्यांना या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने माल विकावा लागणार आहे. एकतर पावसामुळे हवं तसं उत्पन्न निघालं नाही, त्यात आता नाफेडनेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे.

अंतिम खरेदी करण्याची मुदत जाहीर करण्यापूर्वीच खरेदी केंद्र बंद करण्यात आलं. त्यामुळे हजारो क्विंटल उडीद आणि मूग पडून आहे. अमरावतीत नोंदणी केलेल्या 400 पैकी 200 शेतकरी विक्रीपासून वंचित आहेत.

तुलनेने विदर्भात यंदा पाऊस कमी झालाय. त्यात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जे काही पीक उगवलंय त्यालाही सरकारच्या दुर्लक्षामुळे योग्य भाव मिळत नाही. नाफेडने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मूग आणि उडीद खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: naphed closed moong urid purchase center without any idea
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Moong naphed urid उडीद नाफेड मूग
First Published:
LiveTV