दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता

भाजप नेत्यांशी झालेल्या भेटीगाठींनंतर राणेंबाबत निर्णय होईल, असं म्हटलं जात आहे.

दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे दिल्लीत एकत्र असल्याची माहिती आहे. दिल्ली दौऱ्यात राणे भाजपमधील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेण्याची चिन्हं आहेत.

भाजप नेत्यांशी झालेल्या भेटीगाठींनंतर राणेंबाबत निर्णय होईल, असं म्हटलं जात आहे. पुढच्या महिन्यात राज्यसभा निवडणुका आहेत. त्या दृष्टीनं राणेंना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत पाठवण्याचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांची परिषद दिल्लीत सुरु असल्याने मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत गेले आहेत. मात्र दिल्लीत राणेंनीही उपस्थिती लावल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.

नारायण राणेंचं भाजपमध्ये पुनर्वसन होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले होते. राणेंचा आऊटस्पोकन स्वभाव अडसर ठरण्यापेक्षा त्यांचा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा आहे. अशा व्यक्ती  पक्षाची संपत्ती असतात, असंही फडणवीसांनी सांगितलं होतं.

नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला असलेल्या विरोधावर शिवसेना ठाम आहे.

संबंधित बातम्या :


पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते : फडणवीस

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narayan Rane and Devendra Fadanvis allegedly meet in Delhi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV