‘उद्धव ठाकरे लोकांना उल्लू बनवतात’, नारायण राणेंचा हल्लाबोल

‘रत्नागिरीत प्रकल्पाला विरोध असल्याचं सांगायचं आणि तिकडे आतून जमिनींचे व्यवहार करायचे ही शिवसेनेची नीती आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील प्रकल्प रद्द करुन दाखवावे.’

‘उद्धव ठाकरे लोकांना उल्लू बनवतात’, नारायण राणेंचा हल्लाबोल

रत्नागिरी : ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकांना उल्लू बनवतात.’ अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. रत्नागिरीध्ये काल रिफायनरी विरोधी सभा आयोजित केली होती. त्यावेळी नारायण राणे बोलत होते.

‘हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील प्रकल्प रद्द करुन दाखवावे’

‘रत्नागिरीत प्रकल्पाला विरोध असल्याचं सांगायचं आणि तिकडे आतून जमिनींचे व्यवहार करायचे ही शिवसेनेची नीती आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील प्रकल्प रद्द करुन दाखवावे.’ असं आव्हानही राणेंनी दिलं आहे.

‘…यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ’

‘मी या सगळ्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहतोय. इथल्या जमिनींवर आलेले हे संकट घालवण्यासाठी सगळ्यांनी मिळून संघर्ष करणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ.’ असंही राणे यावेळी म्हणाले.

…तर आम्ही सहन करणार नाही!

‘कोणाच्या दबावाखाली इथले पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतील तर सहन करुन घेतले जाणार नाही. असंही राणे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे या दोघांनीही आपल्या भाषणात शिवसेनेवर टीका केली.

VIDEO : 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narayan Rane criticizes Uddhav Thackeray in Ratnagiri latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV