बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक

रामेश्वर मासाळ यांच्यावर कटात सहभाग असल्याने गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. माझाने याबाबत कालच राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा सहभाग असल्याची माहिती दिली होती.

बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक

पंढरपूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीवर पडलेल्या 70 लाखांच्या दरोडा प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा रामेश्वर मासाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरोडा प्रकरणातील 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रामेश्वर मासाळ यांच्यावर कटात सहभाग असल्याने गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. एबीपी माझाने याबाबत कालच राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा सहभाग असल्याची माहिती दिली होती.

काल रात्री उशिरा मासाळ यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेला रामेश्वर मासाळ हा अजित पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखला जात होता.

rameshwar Masal रामेश्वर मासाळ

दरम्यान या दरोड्याचा बनाव रचल्याच्या कारणावरुन बँक व्यवस्थापक अमोल भोसले आणि दरोड्यातील आरोपी भाऊसाहेब कोळेकर याना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून मासाळ हा या गुन्ह्यातील तिसरा आरोपी बनला आहे.

बँक व्यवस्थापक अमोल भोसले यांच्यासोबत रामेश्वर मासाळ याचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. यातूनच हा बँक दरोड्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.

कालच्या तपासात पोलिसांनी या आरोपींकडून 31 लाखांची रोकड जप्त केली आहे. या बँक दरोडा प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले असून दरोड्यातील उर्वरित रकमेचा शोध आता पोलीस घेत आहेत.

संबंधित बातम्या :

पंढरपुरातील 70 लाखांच्या दरोड्याची उकल, मॅनेजरची भूमिका संशयास्पद

पंढरपुरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाखांच्या रकमेची लूट

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: NCP leader Rameshwar Misal arrested by Police latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV