राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनानंतर आज (सोमवार) नागपूरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केलं. मात्र, यावेळी आंदोलकांना महिला पोलिस ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसलं.

राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावले

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनानंतर आज (सोमवार) नागपूरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केलं. मात्र, यावेळी आंदोलकांना महिला पोलिस ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसलं.

संदीप बजोरिया हे यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. हल्लाबोल आंदोलन नागपूरमध्ये दाखल होताच आधी वर्धा रस्त्यावरच्या विमानतळाजवळ सुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला. यावेळी त्यांना काही काळ ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं.

ncp Bajoriya rada

मात्र, त्यानंतर पुन्हा काही अंतरावर जाऊन राष्ट्रवादीनं चक्काजाम सुरु केला. त्यावेळी सुप्रिया सुळेंना ताब्यात घेण्याचा महिला पोलीस प्रयत्न करत होते. त्यावेळी बजोरिया हे पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून जात असल्याचं लक्षात येताच त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ आवर घातला.

दरम्यान, या प्रकारानंतर आमदार बजोरियांवर बरीच टीका सुरु आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पक्षाकडून त्यांच्यावर काही कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: NCP Mla Bajoria and lady police argument in nagpur latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV