क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीला आणखी एक झटका?

जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली.

क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीला आणखी एक झटका?

बीड: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या बीडमध्ये जोर धरु लागली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली.

बीडमधील एका वृत्तपत्राच्या सुवर्ण मोहत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा दिसले. याशिवाय स्टेजवर, पंकजा मुंडे, गिरीष महाजन, आमदार पाशा पटेल, विनायक मेटे यांचीही उपस्थिती होती.

Jaydatta Kshirsagar, CM Devendra Fadnavis 2

काका- पुतण्याचा वाद

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांचा आणि त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात वाद आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद टोकाला गेला होता. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत. राजुऱ्यात मतदानादरम्यान माझ्या उमेदवाराला जयदत्त क्षीरसागर यांनी धमकी दिली, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला होता.

संदीप क्षीरसागर यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बीड राष्ट्रवादीची धुरा संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळेही जयदत्त क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीपासून लांब आहेत.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

  • जयदत्त क्षीरसागर हे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत

  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री होते


संबंधित बातमी

बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांविरोधात पुतण्या संदीप यांची तक्रार

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: NCP MLA Jaydutt Kshirsagar, Jaydatta Kshirsagar may join BJP
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV