मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सरपंच

एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या, मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सरपंच

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होमग्राऊण्डवरच धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान होत आहे.

नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना झटका मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलेल्या धनश्री ढोमणे सरपंच झाल्या आहेत.
राज्यभरातल्या 3 हजार 700 ग्रामपंचायतींचा आज निकाल

एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या आहेत, तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजेतेपद मिळालं. मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटलं आहे.

काल 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. यातील साधारण 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV