गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

दारुचा खप वाढवण्यासाठी ब्रँडला महिलेचं नाव देण्याचा सल्ला देणाऱ्या गिरीश महाजनांविरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.

गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

नाशिक : दारुचा खप वाढवण्यासाठी ब्रँडला महिलेचं नाव देण्याचा सल्ला देणाऱ्या गिरीश महाजनांविरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.

. नाशिक आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळं समस्त महिला वर्गाचा अपमान झाला आहे. त्यामुळं त्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही शेलक्या शब्दात गिरीश महाजनांवर टीका केली आहे.

दुसरीकडे, दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाजनांनी या वक्तव्याद्वारे महिलावर्गाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यातील पाणीटंचाई निवारणाचे प्रयत्न करा, दारुचे मार्केटिंग कन्सल्टन्ट होऊ नका, असं महाजनांना सांगण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही गोस्वामी म्हणाल्या.

साखर कारखान्यानं निर्मित केलेल्या दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं विधान गिरीश महाजन यांनी केलं. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

केवळ दारुच नव्हे, तर हल्ली तंबाखू उत्पादनांनाही महिलांचीच नावं दिली जातात, असंही महाजन म्हणाले.

काय म्हणाले गिरीश महाजन?

संबंधित बातम्या :

दारुच्या ब्रँडला महिलांचं नाव, गिरीश महाजनांविरोधात तक्रार

दारुच्या ब्रँडला महिलांचं नाव द्या, खप वाढेल : गिरीश महाजन

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: NCP’s Protest against Girish Mahajan latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV