बुलेट ट्रेनसाठी पैसा, मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष : निलम गोऱ्हे

कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीनं समाजात नाराजी आहे. त्यामुळे सेना अंशतः समाधानी असून अस्वस्थता कायम असल्याचं म्हटलं.

Neelam Gorhe criticized Government latest updates

अहमदनगर : सरकारकडे बुलेट ट्रेनसाठी पैसा आहे, मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय, असे म्हणत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या दृष्टीकोनाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.

सरकार सोळा कौटुंबिक न्यायालय स्थापल्याची जाहीरात करतं. मात्र दोन वर्षांतलं हे यश नसून 2006 पासून पाठपुरावा केल्यानं शक्य झाल्याचं गोर्‍हे यांनी म्हटलं. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी गोऱ्हे यांनी महिलांवरील अत्याचार आणि हत्येच्या खटल्यात आरोपींना लवकर शिक्षेसाठी वरीष्ठ न्यायालयात जलदगती न्यायालयात सुनावणीची गरज व्यक्त केली.

शिक्षेनंतर आरोपी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करतात. त्यामुळे आरोपींच्या शिक्षेला विलंब होत आहे. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात महिला अत्याचाराच्या खटल्यात जलदगती न्यायालयात सुनावणीची गरज त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर संरक्षण विभागातील महिलांवर नागरिकांकडून अत्याचार झाल्यावर पीडितेला वैद्यकीय सुट्टी मिळत नाही. त्यामुळे शारीरिक दुखापत आणि वैद्यकीय मदतीचा समावेश करण्याची मागणी गोर्‍हे यांनी केली.

तर पोक्सो न्यायालयात लहान मुलं आणि मुलींना अश्वासक वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. बालकांची व्हिडिओ कॉन्फरन्सनं साक्ष घेण्याची गरज गोर्‍हे यांनी व्यक्त केली. महिलांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं.

सभागृहात महिला आमदार कमी असून मी एकटी पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इतर महिला आमदारांनी पाठपुरावा करण्याची गरज गोर्‍हे यांनी व्यक्त केली.

यावेळी गोर्‍हे यांनी सरकारच्या जाहीरतीवरही नाराजी व्यक्त केली. सरकार सोळा ठिकाणी कौटुंबिक न्यायालय स्थापल्याची जाहीरात करतं. मात्र केवळ दोन वर्षात ही न्यायालयं स्थापन झाली नसून 2006 पासून वारंवार पाठपुरावा केल्याचं त्यांनी म्हटलं.

यावेळी गोर्‍हे यांनी सरकारवर बोलताना पूर्वीच्या सरकारसारखं आमच्यात सख्य नसल्याची कबुली दिली. अघाडी सरकारच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनतेला न्याय देण्याची अपेक्षा होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलोय, मात्र आमचं हिंदुत्व सनातनी नसल्याचं ही त्यांनी म्हटलं.

कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीनं समाजात नाराजी आहे. त्यामुळे सेना अंशतः समाधानी असून अस्वस्थता कायम असल्याचं म्हटलं.

यावेळी गोऱ्हे यांनी पोलिसांवर ही निशाणा साधला. सध्या गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचा रेट 57 टक्केवर आला आहे. मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांना अहंकार आणि गुर्मी आहे, असा आरोप गोऱ्हेंनी केला. नगरच्या पोलीस अधीक्षकांना कारवाईनंतर बढती मिळण्यामागे लक्ष्मी दर्शन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Neelam Gorhe criticized Government latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले
नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले

नवी दिल्ली/अहमदनगर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017* 1. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री

कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?
कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते

गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे
गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस

मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!
मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!

अहमदनगर : मनसेच्या पत्र व्यवहारानंतर राज्यस्तरीय कबड्डी आणि

कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी
कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी

अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या

तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर
तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर

औरंगाबाद: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तांत्रिक

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

औरंगाबाद: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन,

नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

अहमदनगर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या नितीन