शिर्डीत गर्दी, शिवराज सिंह चौहान, विखे पाटील मध्यरात्री साईचरणी

काल सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशातील साई भक्तांसह परदेशातील साई भक्तांनी साई नगरीत हजेरी लावत नववर्षाचे स्वागत केलं.

शिर्डीत गर्दी, शिवराज सिंह चौहान, विखे पाटील मध्यरात्री साईचरणी

शिर्डी: सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली.

काल सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशातील साई भक्तांसह परदेशातील साई भक्तांनी साई नगरीत हजेरी लावत नववर्षाचे स्वागत केलं.

काल रात्रभर मंदिर उघडे असल्याने रात्री 12 वाजता साईंचं दर्शन घ्यावं या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याचं प्रकर्षाने जाणवलं.

तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी साई दर्शन करुन नवीन वर्षाची सुरवात केली.

याशिवाय राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सपत्नीक साईंचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचा प्रारंभ केला.

दरम्यान, साईनगरीत नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. अनेक तास रांगेत उभं राहात भाविकांनी नवीन वर्षात सुख - शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडं घातलं.

साईबाबा संस्थाननेही नवीन वर्षाचं स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलं. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली.

साईबाबा संस्थानने काही दिवसापूर्वी टाईमदर्शन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ‘टाईम पास’च्या माध्यमातून दर्शन मिळत असल्याने, तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भक्तांची सुटका झाली असं वाटत असले, तरी गर्दीच्या काळात साई भक्तांची मात्र चांगलीच तारांबळ उडताना दिसली.

शिर्डी संस्थानचे सर्व भक्त निवास हाऊसफुल्ल झाले आहेत, तर शिर्डीतील शेकडो हॉटेलवरही साईभक्तांची मोठी गर्दी आहे. एकंदरीत शिर्डीत नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांचा मेळा जमला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: New Year celebration at Shirdi Sai Baba Mandir
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV