...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नसल्याची प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी घेतली.

...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे

कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी घेतली आहे. ते कुडाळमधील सभेत बोलत होते.

काँग्रेसने सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्तीनंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या नारायण राणेंनी कुडाळमध्ये सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याआधी त्यांनी गोवा ते कुडाळ असं शक्तिप्रदर्शन केलं. या कुडाळमधील सभेत माजी खासदार निलेश राणेंनीही कार्यकर्त्यांना संबोधलं.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नसल्याची प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी घेतली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनीच निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले होते. शिवाय, शिवसेना आणि नारायण राणे यांचं वैर सर्वश्रुत आहे.

दरम्यान, निलेश राणेंच्या या ‘दाढी प्रतिज्ञे’वर खासदार विनायक राऊत यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे विनायक राऊत किंवा शिवसेनेकडून  याबाबत काय प्रतिक्रिया येते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV