नितीन आगे हत्या: फितूर साक्षीदारांची कोर्टात हजेरी

सर्व फितूर साक्षीदारांनी आम्ही प्रत्यक्षदर्शी नाही, घटनेबाबत काहीच माहिती नाही, पोलिसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा केला.

नितीन आगे हत्या: फितूर साक्षीदारांची कोर्टात हजेरी

अहमदनगर: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बहुचर्चित नितीन आगे हत्याप्रकरणी 13 फितूर साक्षीदारांनी न्यायालयात म्हणणं सादर केलं. गेल्या आठवड्यात बारा जणांनी तर बुधवारी एका फितूरानं  जिल्हा सत्र न्यायालयात म्हणणं मांडलं.

सर्व फितूर साक्षीदारांनी आम्ही प्रत्यक्षदर्शी नाही, घटनेबाबत काहीच माहिती नाही, पोलिसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा केला. 13 पैकी आठ जणांनी 164 नुसार जबाब दिला, मात्र त्यांनीही पोलीसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचं म्हटलं आहे. तर दोन पंचानी आमच्या फक्त सह्या घेतल्या असून, आम्ही घटनास्थळी नसल्याचं म्हटलं आहे.

नितीन आगे हत्याच्या खटल्यात न्यायाधीश हूड यांनी निकाल दिला होता. त्यामुळं आता फितुरांची सुनावणी ही त्याच्यांसमोरच घेण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. याबाबतचा अर्ज प्रधान जिल्हा न्यायाधीश प्रकाश माळी यांच्याकडं सादर करण्यात आला. याबाबतची पुढील  22 जानेवारीला होणार आहे.

नितीन आगेची हत्या 2014 साली प्रेमप्रकरणातून झाली होती. मात्र याप्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते. तर  164 कलमानुसार आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र  13 साक्षीदार फितूर झालेत.

शिक्षक बाळू गोरे, रमेश काळे आणि साधना फडतरे आणि शिपाई विष्णू जोरे यांच्यासह 13 जण फितूर झाले. तर नितीनचे आई, वडील, दोन बहीण आणि पंचनामा करणारे तपास अधिकारी आणि शवविच्छेदन अधिकारी हे सरकारच्या बाजूनं राहिले आहेत.

त्यामुळं 13 फितूर साक्षीदारांवर कारवाईचा आदेश दिल्यानुसार न्यायालयीन कामकाज सुरु झालं आहे. त्यानुसार सदाशिव होडशीळ, विकास डाडर, रमेश काळे, रावसाहेब सुरवसे, लखन नन्नवरे, बबलू जोरे, विष्णू जोरे, सदाशिव डाडर, साधना फडतरे, राजेंद्र गिते, अशोक नन्नवरे, हनुमंत मिसाळ, राजू जाधव यांनी म्हणणं मांडलंय.

नितीन आगे हत्या प्रकरण काय आहे?

28 एप्रिल 2014 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन राजू आगेची हत्या झाली होती. नितीन न्यू इंग्लिश स्कूलमधे बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणाच्या वादातून नितीनला आरोपींनी शाळेत मारहाण केली होती. मारहाण करतच आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर  लिंबाच्या झाडाला नितीनला गळफास दिला होता.

या प्रकरणी सचिन गोलेकरसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी 3 अल्पवयीन होते, तर एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. हत्येनंतर राज्यात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या घटनेने राज्य ढवळून निघालं होतं.  त्यानंतर नोव्हेंबर 2016 पासून सुनावणीला सुरुवात झाली. या दरम्यान 26 साक्षीदार तपासले. यापैकी 14 साक्षीदार फितूर झाले होते.

या खटल्यात  नितीनचे वडिल राजू आणि आईचीही साक्ष नोंदवली. आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवलं. सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता.

नितीन आगे हत्या प्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते. तर 164 कलमानुसार आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र 13 साक्षीदार फितूर झाले.

संबंधित बातम्या

नितीन आगे हत्या खटला पुन्हा नव्याने चालणार 

नितीन आगे हत्या : 13 फितूर साक्षीदार कोर्टात हजर राहणार!

नितीन आगे हत्या प्रकरणातील 13 फितुरांवर कारवाई होणार

''कोपर्डी निकालानंतर आनंद व्यक्त करणारे नितीन आगे प्रकरणी गप्प का"? 

'नितीन आगे खूनप्रकरणी हायकोर्टात धाव घेऊ' 

नितीन आगे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार : राजकुमार बडोले

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nitin Aage murder case : 13 peoples present before ahmednagar district court
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV