गिरीश महाजनांसमोर गडकरींकडून आरोग्य विभागाचे वाभाडे

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचं वास्तव वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मांडलं.

गिरीश महाजनांसमोर गडकरींकडून आरोग्य विभागाचे वाभाडे

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचं वास्तव वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मांडलं. आपल्या आरोग्य विभागात मशिन्स असले तर ऑपरेटर नाही आणि ऑपरेटर असले तर मेंटेनन्स नाही, अशी परिस्थिती असल्याचं सांगितलं.

राज्यात नवनवीन आरोग्यासंदर्भात सोयी आणल्या जातात. मात्र (गिरीश महाजनांना उद्देशून) तुमच्या विभागात एकतर मशिन्स येत नाहीत. मशिन्स आलेत तर ऑपरेटर येत नाहीत. ऑपरेटर आले तर मेंटेनन्स नाही आणि मेंटेनन्स केलं तर पैसे नाहीत, अशी अवस्था आहे, असं म्हणतं गडकरींनी राज्याच्या आरोग्य विभागाची परिस्थिती त्या विभागाच्या मंत्र्यासमोरच सांगितली.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. गडकरींच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

केंद्राकडून काय हवी ती मदत घ्या आणि सगळं व्यवस्थित ठेवा, असंही गडकरींनी गिरीश महाजनांना प्रत्यक्ष सांगितलं.

राज्यातील आणि देशातील पहिल्या शासकीय स्तरावर स्टेम सेल नोंदणीची मोहीम आणि प्रकल्प नागपुरात सुरु झाला. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV