रेल्वेत चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता : नितीन गडकरी

रेल्वे खात्यात चांगल्या अधिकाऱ्यांची उणीव आहे, असं म्हणत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत घडलेल्या दुर्घटनेवर भाष्य केलं.

रेल्वेत चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता : नितीन गडकरी

नागपूर : रेल्वे खात्यात चांगल्या अधिकाऱ्यांची उणीव आहे, असं म्हणत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत घडलेल्या दुर्घटनेवर भाष्य केलं. आज नागपूर मेट्रो ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी गडकरींनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

रेल्वेत चांगल्या अधिकाऱ्यांची उणीव असल्याचं सांगून गडकरी पुढे म्हणाले की, देशभरातील सर्वाधिक लालफितशाही कुठं असेल, तर ती रेल्वे खात्यात आहे.

दरम्यान, कालच्या घटनेवरुन मुंबईत आज राज ठाकरेंनीही रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका केली. तसेच, मुंबई लोकल प्रवास सुखकर होईपर्यंत बुलेट ट्रेन धावू देणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.

एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं.

त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. या घटनेनंतर, रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारवर चहूबाजूने टीका होत आहे.

संबंधित बातम्या

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही : राज ठाकरे

चेंगराचेंगरीमुळे महाराष्ट्र दु:खात, दोषींवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री

एल्फिन्स्टन दुर्घटना : 24 वर्षाच्या हिलोनीचा चेंगराचेंगरीत मृत्यू

एल्फिन्स्टन दुर्घटना : वडिलांशी चुकामूक श्रद्धाच्या जीवावर बेतली

एल्फिन्स्टन दुर्घटना : ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तेरेसा यांचा मृत्यू

स्टेशनवरील कामं दोन आठवड्यात सुरु करा, पियुष गोयल यांचे आदेश

दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू

एल्फिन्स्टन दुर्घटनेत ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू

कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : … तर ही दुर्घटना टाळता आली असती!

दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदाचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मुंबईतील ही स्टेशन्स मृत्यूचा सापळा!

बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या!

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?

एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?

LIVE : मुंबईत एलफिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी

एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV