- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
येत्या 30 सप्टेंबरला दसरा आहे. परंतु भगवान गडावर पारंपरिक वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कोणत्याही व्हीआयपीला निमंत्रित केलेलं नाही. त्याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक सभा आणि मेळावा आयोजित करण्यात आला नाही. संस्था स्वायत्त असून गडावर सभा, मेळावा न घेण्याचा ठराव ट्रस्टने एकमताने मंजूर केला आहे.
भगवान गडाचे सर्व धर्माचे आणि राजकीय पक्षाचे अनुयायी आहेत. त्यामुळे परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे, अशा आशयाचं निवेदन भगवान गडाच्या वतीने मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना देण्यात आलं आहे.