गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत चकमक, नक्षल्यांनी पोलिसांना ओलिस ठेवलं

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. ग्यारपत्ती भागात सुरु झालेल्या चकमकीत हा जवान शहीद झाला असून अजूनही ही चकमक सुरुच आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत चकमक, नक्षल्यांनी पोलिसांना ओलिस ठेवलं

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. ग्यारपत्ती भागात सुरु झालेल्या चकमकीत हा जवान शहीद झाला असून अजूनही ही चकमक सुरुच आहे. काही पोलिसांना नक्षल्यांनी ओलीस ठेवलं आहे.

शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात एक जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले होते. यानंतर ग्यारपत्ती भागात पोलिसांनी नक्षलवादीविरोधी अभियान सुरु केलं होतं. रात्री सीआरपीएफचे आणि सी 60 दलाचे जवान शोध मोहीम राबवून परतत असताना नक्षलवाद्यांनी घातपातानं जवानांवर हल्ला चढवला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. मात्र या चकमकीत एका जवानाला आपला जीव गमावावा लागला आहे.

दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांना घेरलं असून अजूनही पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचं कळतं आहे. पोलिसांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: one jawan martyred in naxal attack in gadchiroli latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV