हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी, जाहिरातबाजी विरोधकांच्या अजेंड्यावर

हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली.

हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी, जाहिरातबाजी विरोधकांच्या अजेंड्यावर

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला उद्यापासून (11 डिसेंबर) सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली.

नागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरतला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.

ओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

दरम्यान, ओखी वादळामुळे जेवढं नुकसान झालं नसेल तेवढं युती सरकारच्या काळात झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

यासोबतच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार हे मुद्दे उचलले आहेत. त्यामुळे आता सरकारला अधिवेशनात चांगलाच विरोध पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: opposition parties press conference before Legislature winter session
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV