उस्मानाबादेत चाऱ्याचं बेणं म्हणून शेतकऱ्यांना वाळलेलं गवत

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून विदर्भ आणि मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी महादूध हा प्रकल्प सुरु करण्यात आला.

उस्मानाबादेत चाऱ्याचं बेणं म्हणून शेतकऱ्यांना वाळलेलं गवत

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये चारा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. चाऱ्याचं बेणं म्हणून चक्क गवताचं ठोंब वाटप करण्यात आलं. प्रत्यक्षात हे सर्व वाळलेलं गवत निघाल्याने शेतकरी संतापले आहेत.

जेव्हा हे वाळलेलं गवत शेतकऱ्यांसमोर पोहोचलं, तेव्हा या गवताचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर पशु संवर्धन विभागाकडेही नव्हतं.

संतापलेल्या शेतकऱ्यांनी गवताच्या पेंढ्या मोडून टाकल्या. योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली. या गवताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून विदर्भ आणि मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी महादूध हा प्रकल्प सुरु करण्यात आला. महादूध असं या प्रकल्पाचं नाव आहे.

विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि जालना अशा एकूण 11 जिल्ह्यांत हा प्रकल्प राबवला जात आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Osmanabad : Farmers were distributed hay as fodder latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV