... म्हणून सारंगी महाजन यांचे गोपीनाथ मुंडेंवर बेछूट आरोप : प्रकाश महाजन

दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिल्याचा राग सारंगी महाजन यांच्या मनात आजही कायम आहे. त्यामुळेच त्या मुंडेंविरोधात बेछूट आरोप करत असल्याचा, दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

... म्हणून सारंगी महाजन यांचे गोपीनाथ मुंडेंवर बेछूट आरोप : प्रकाश महाजन

औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिल्याचा राग सारंगी महाजन यांच्या मनात आजही कायम आहे. त्यामुळेच त्या मुंडेंविरोधात बेछूट आरोप करत असल्याचा, दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, याबरोबरच काल सारंगी महाजन यांनी अनेक गंभीर आरोप केले. त्या सर्व आरोपांना खोट ठऱवत सारंगी महाजन या फक्त कुटुंबाची बदनामी करत असल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.

“प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी गोपीनाथ मुंडेंच्याच साक्षीमुळे प्रवीण महाजन यांना जन्मठेप झाली. त्यामुळेच सारंगी महाजन गोपीनाथ मुंडेंचा राग करत आहेत. यापूर्वीही त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख प्रादेशिक नेते म्हणून केला होता,” असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

“सारंगी महाजन यांनी जरुर आत्मचरित्र लिहावं,” असा सल्ला देत प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, “त्या पुस्तकातील संदर्भ चुकीचे असल्यास, त्याचं मी त्याच शब्दात उत्तर देईन,” असा इशाराही प्रकाश महाजन यांनी दिला.

दरम्यान, उस्मानाबादेतील 29 गुंठ्यांच्या जमिनीवरुन सारंगी महाजन आणि महाजन कुटुंबियांमध्ये वाद सुरु आहे. मात्र, याच वादाबरोबर इतर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

काय म्हणाले प्रकाश महाजन?

संबंधित बातम्या

प्रवीण महाजनांचा मृत्यू नैसर्गिक नाही : सारंगी महाजन

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pakash mahajan answers on sarangi mahajans allegation
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV