विजेत्याला बोकड, उपविजेत्याला कोंबड्या, पालघरमध्ये क्रिकेट टुर्नामेंट

विजेत्याला बोकड, उपविजेत्याला कोंबड्या, पालघरमध्ये क्रिकेट टुर्नामेंट

पालघर : विजेत्याला बोकड, उपविजेत्याला सहा गावठी कोंबड्या, तर मॅन ऑफ दि सिरीजला अंड्यांचा ट्रे, पालघरच्या जव्हार तालुक्यातल्या टेनिस क्रिकेट टुर्नामेंटची ही आगळी वेगळी बक्षीसं ठेवण्यात आली होती. ग्रामीण भागात उत्पन्न कमी असल्यामुळे ठेवलेली ही बक्षीसं प्रत्यक्षात मात्र स्पर्धकांच्या आकर्षणाचा विषय होती.

जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये क्रिकेटच्या मांसाहारी मनोरंजन चषक 2017 चं  आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे प्रेक्षकांमधून जो कॅच पकडेल त्यालाही बक्षीस म्हणून अंडी दिली गेली.

गावात उत्पनाची साधनं कमी असल्याने क्रिकेट स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्याला संघाला पैसे देण्याऐवजी मांसाहाराची बक्षीसं ठेवण्यात आली. वेगवेगळ्या गावातून आलेल्या अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

संघाला जिंकवून बोकड मिळवण्याच्या इर्षेने सगळेच संघ खेळले. अखेर दर्यासागर मित्र मंडळ संघाने हा बोकड जिंकला. तर उपविजेता ठरलेल्या रॉयल टीचर इलेव्हन या संघाला या सहा कोंबड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या व्यतिरिक्त चौकार आणि षटकार लगावणाऱ्यांना तितकीच बक्षीस म्हणून देण्यात आली होती.

First Published: Monday, 20 March 2017 7:09 PM

Related Stories

भंडाऱ्यातील कार्कापुरात अग्नितांडव, गावकऱ्यांना भानामतीचा संशय
भंडाऱ्यातील कार्कापुरात अग्नितांडव, गावकऱ्यांना भानामतीचा संशय

भंडारा : 10 घरं पेटली… अनेक गोठ्यांची राखरांगोळी झाली…

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017   सरकारची नाफेड तूर खरेदी

नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा

उस्मानाबाद : नाफेडची तूरखरेदी मध्यरात्रीपासून बंद करण्यात

इंधनात महा'ग'राष्ट्र, देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात!
इंधनात महा'ग'राष्ट्र, देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात!

मुंबई : पेट्रोल दराच्या बाबतीत महाराष्ट्रला महा’ग’राष्ट्र अशी

52 तास सलग स्वयंपाक, विष्णू मनोहर यांचा नागपूरमध्ये नवा विश्वविक्रम
52 तास सलग स्वयंपाक, विष्णू मनोहर यांचा नागपूरमध्ये नवा विश्वविक्रम

नागपूर : प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी 52 तास स्वयंपाक करण्याचा

लातूरमध्ये शेतात चार फूट लांब, 65 किलो वजनी मगर!
लातूरमध्ये शेतात चार फूट लांब, 65 किलो वजनी मगर!

लातूर : लातूरमध्ये चक्क एका शेतामध्ये मगर आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या सांस्कृतिक मेळाव्यात राणेंचा बोलण्यास नकार
सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या सांस्कृतिक मेळाव्यात राणेंचा...

  सिंधुदुर्ग : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरुन सर्वत्र जोरदार

पाण्यासाठी 45 डिग्रीच्या उन्हात शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून आंदोलन
पाण्यासाठी 45 डिग्रीच्या उन्हात शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून आंदोलन

सोलापूर : पाण्यासाठी 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचं

सिंधुदुर्गात जिल्हा काँग्रेसचा सांस्कृतिक मेळावा, राणेंच्या भाषणावर सर्वांचं लक्ष
सिंधुदुर्गात जिल्हा काँग्रेसचा सांस्कृतिक मेळावा, राणेंच्या...

सिंधुदुर्ग : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे

बाबरी मशीद : मुरली मनोहर जोशी आणि सरसंघचालकांची भेट
बाबरी मशीद : मुरली मनोहर जोशी आणि सरसंघचालकांची भेट

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी