बीडच्या 'त्या' 6 झेडपी सदस्यांना पंकजा मुंडेंकडून दिलासा

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांचं पद रद्द करण्याचा आदेश दिला होता.

बीडच्या 'त्या' 6 झेडपी सदस्यांना पंकजा मुंडेंकडून दिलासा

बीड : पक्षादेश डावलल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवलेल्या बीडच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलासा दिला आहे. पक्षादेश डावलून भाजपला साथ देणाऱ्या या सहा जिल्हा परिषद सदस्यांचं पद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

शिवाजी पवार (पाडळी), अ‍ॅड. प्रकाश कवठेकर (डोंगरकिन्ही), अश्विनी जरांगे (अंमळनेर), संगीता महानोर (दौलावडगाव), अश्विनी निंबाळकर (हरि नारायण आष्टा) सर्व धस समर्थक आणि मंगल डोईफोडे (पिंपळनेर) आ. क्षीरसागर समर्थक या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाली होती.

काय आहे प्रकरण?

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीदरम्यान राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या धस समर्थक पाच सदस्यांनी पक्षादेश डावलून भाजपला मतदान केलं होतं. तर क्षीरसागर गटाच्या मंगल डोईफोडे आजारी असल्याचं सांगून मतदानाला गैरहजर राहिल्या होत्या. सर्वाधिक सदस्य निवडून येऊनही राष्ट्रवादीला जि.प. मधील सत्ता गमवावी लागली होती.

याप्रकरणी राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकेड आक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे सुनावणी झाली. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी सिंह यांनी पक्षादेश डावलल्याप्रकरणी सहाही सदस्यांना अपात्र ठरवलं होतं.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती

अपात्र ठरलेल्या सहाही सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धाव घेतली होती. पंकजा यांच्याच ताब्यात जि.प. असल्याने त्यांनी भाजपला थेट सहकार्य करणाऱ्या पाच आणि क्षीरसागर समर्थक एका सदस्याला दिलासा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरित स्थगिती दिली.

ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव आर. एम. गेंगजे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना याबाबत कळवलं आहे.

बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल – एकूण जागा- 60

  • राष्ट्रवादी- 25

  • भाजपा- 19

  • काँग्रेस- 03

  • शिवसंग्राम- 04

  • शिवसेना- 04

  • काकू-नाना आघाडी- 03

  • गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)

  • अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)


संबंधित बातमी :  बीडमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्यांचं पद रद्द

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV