अंबाजोगाईत मराठी भाषेचं विद्यापीठ आणण्यासाठी प्रयत्न करणार : पंकजा मुंडे

मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं.

अंबाजोगाईत मराठी भाषेचं विद्यापीठ आणण्यासाठी प्रयत्न करणार : पंकजा मुंडे

बीड : ''अंबाजोगाई शहराला प्राचीन साहित्याचा इतिहास तर आहेच, याशिवाय मराठी साहित्यातील पहिली कविता लिहिणाऱ्या आद्य कवी मुकुंदराज यांची ही कर्मभूमी आहे. म्हणून आगामी काळात अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं'', यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.

मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून  अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आद्य कवी मुकुंदराज साहित्यनगरीत प्रारंभ झाला. पंकजा मुंडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष जि.प. सभापती राजेसाहेब देशमुख, यांच्यासह अनेक राजकीय आणि साहित्य क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वी विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अंबाजोगाईमध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं यासाठीचे ठराव घेण्यात आले आहेत. म्हणूनच हे विद्यापीठ अंबाजोगाईत व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दोन दिवस चालणारं हे साहित्य संमेलन अंबाजोगाईकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंतांच्या अंबानगरीत हे साहित्य संमेलन होत असल्याने अंबाजोगाईच्या सांस्कृतिक इतिहासात भर पडणार आहे. यावेळी सकाळी 8 वाजता शहरातून जागर दिंडी काढण्यात आली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pankaja Munde will try to bring Marathi language university in Ambajogai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV