दिवाळीत पगार न मिळाल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

सुमित्रा भगवानराव राखुंडे असं मृत महिलेचे नाव असून तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

दिवाळीत पगार न मिळाल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

परभणी : परभणीत अंगणवाडी सेविकेने आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाळीत सरकारकडून पगार न मिळाल्यामुळे महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोर्डी मध्ये ही घटना घडली. सुमित्रा भगवानराव राखुंडे असं मृत महिलेचे नाव असून तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

2008 ते 2017 या कालावधीतील रजिस्टर पीआरसीला दाखवा, असं ऑफिसकडून सांगण्यात आलं होतं. याचा त्रास सहन न झाल्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून महिलेता मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Parbhani : Anganwadi Sevika commits suicide for allegedly not getting salary during Diwali latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV