कार्यकर्ते हळूच विचारतात, साहेब गुजरातमध्ये काय होईल? - विनोद तावडे

जे सरकार काम करत त्यांना अडचणी निर्माण केल्या जातात. पण तुम्ही साथ द्याल, अशी अपेक्षाही तावडेंनी व्यक्त केली.

कार्यकर्ते हळूच विचारतात, साहेब गुजरातमध्ये काय होईल? - विनोद तावडे

मुंबई : गुजरात निवडणुकीत काय होणार, असं कार्यकर्ते हळूच विचारतात, पण 2007, 2012 मध्ये जे झालं ते आता पण होईल, असं भाकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे.

एका कार्यक्रमात विनोद तावडे बोलत होते. कार्यकर्ते हळूच विचारतात, तावडे साहेब गुजरातमध्ये काय होईल. मोदींची हवा गेली अशी चर्चा होते. पण 2012, 2007 ची वर्तमानपत्रे काढून बघा, तेव्हा पण अशीच चर्चा होती. पण तेव्हाही मोदी निवडून आले. जे सरकार काम करत त्यांना अडचणी निर्माण केल्या जातात. पण तुम्ही साथ द्याल, अशी अपेक्षाही तावडेंनी व्यक्त केली.

जीएसटी आणि नोटाबंदी यामुळे सरकारविरोधात जे वातावरण तयार झालं आहे, त्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये भाजपची कसोटी लागणार आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्येही याबाबत चर्चा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होत आहे. 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 डिसेंबरला होईल आणि 18 डिसेंबरला गुजरातवर झेंडा कुणाचा याचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: party workers asking about Gujarat election says vinod tawde
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV