रामटेक बंगला वापरल्याचे 15.50 लाख भरा, खडसेंना स्मरणपत्र

रक्कम भरण्याबाबतचं स्मरणपत्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून एकनाथ खडसेंना देण्यात आलं आहे.

रामटेक बंगला वापरल्याचे 15.50 लाख भरा, खडसेंना स्मरणपत्र

मुंबई : मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय निवासस्थान रामटेक बंगला वापरल्याचे साडे पंधरा लाख रुपये भरा, अशी आठवण सार्वजनिक बांधकाम विभागाने भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करुन दिली आहे. याबाबतचं स्मरणपत्र त्यांना देण्यात आलं आहे.

माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ही माहिती दिली. अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना वितरित केलेला शासकीय बंगला 'रामटेक'बाबत माहिती विचारली होती.

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 4 जून 2016 रोजी राजीनाम्यानंतर 19 जून 2016 रोजी त्यांना बंगला रिक्त करणं आवश्यक होतं. माजी मंत्र्यांना पहिले 15 दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क असतं, त्यानंतर 3 महिन्यासाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फुट 50 रुपये आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यांसाठी 100 रुपये एवढा दंडनीय आकार निश्चित केला आहे.

अनिल गलगली यांच्याच आरटीआयनंतर शासनाने खडसेंना 3 महिन्यांची परवानगी दिली होती. एकनाथ खडसे हे वास्तव्य करीत असलेले शासकीय निवासस्थान 'रामटेक' बंगला वापरापोटी असलेली दिनांक 19 नोव्हेंबर 2016 पर्यंत थकबाकी 15 लाख 49 हजार 975 रुपये आहे.

ना.दा. मार्ग येथील शासकीय बंगला 'रामटेक' येथे एकनाथ खडसे, माजी मंत्री यांनी दिनांक 19 नोव्हेंबर 2014 मध्यान्ह पूर्व पासून बंगल्याचा ताबा घेतला होता. 19 नोव्हेंबर 2016 रोजी बंगल्याचा रिक्त ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात दिलेला आहे.

दरम्यान खडसे यांच्या थकबाकीची वसूली त्यांच्या वेतनातून वळते करण्याची मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. शिवाय संबंधितांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pay ramtek uses charge of rupees 15.50 lakhs pwd letter to eknath khadse
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV