लातुरात पोलिसाची अरेरावी, ‘आप’च्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण

फरमान बारब्बा असे या उर्मट पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातुरात पोलिसाची अरेरावी, ‘आप’च्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण

लातूर : लातूर शहरात पोलिसांची अमानूषता दिसली. शांततेने निदर्शनं करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याला एखाद्या गुन्हेगाराला मारावे, तशी बेदम मारहाण पोलिसांनी केली.

फरमान बारब्बा असे या उर्मट पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून लातुरातील आप कार्यकर्ते निदर्शनं करुन निषेध नोंदवत होते. यावेळी निदर्शनं लवकर आटपावी, यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने अरेरावी सुरु केली.

यावेळी अमित पांडे या ‘आप’ कार्यकर्त्याला पोलिस कर्मचारी फरमान बारब्बा याने फरफटत पोलिस ठाण्यात नेले आणि तिथे अमानुषपणे मारहाण केली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Police beats AAP worker in Latur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: AAP Police आप पोलिस
First Published:

Related Stories

LiveTV