पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या

मोना विनोद चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. मोना यांचे पती विनोद चव्हाण हे येरमाळा पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या

उस्मानाबाद : पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळात घडली आहे. मोना विनोद चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. मोना यांचे पती विनोद चव्हाण हे येरमाळा पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

आज सकाळी मोना यांनी पतीच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर तातडीने त्यांना बार्शीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, मोना यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, मोना चव्हाण यांच्याकडून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या  आत्महत्येचं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: police officer’s wife committed Suicide in Osmanabad latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV