धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच, घटनास्थळी जाण्यास सर्वांनाच मनाई : पंकजा मुंडे

या कारखान्यातील गरम ऊसाच्या रसाची टाकी फुटून आतापर्यंत 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते.

धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच, घटनास्थळी जाण्यास सर्वांनाच मनाई : पंकजा मुंडे

बीड : वैद्यनाथ साखर कारखान्यात जी घटना घडली, त्या घटनास्थळी जाण्याची कुणालाही परवानगी नाही. कारखान्याची घटना ही अपघात आहे की आणखी काही याचा तपास सुरु आहे. कुठल्याही अपघाताचे घटनास्थळ हे विविध तपासणीसाठी योग्य रहावे यासाठी सील ठेवणं आवश्यक असतं.  मात्र त्या ठिकाणी गेलेल्या विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना अडवणं योग्यच होतं, असं स्पष्टीकरण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

पंकजा मुंडे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चेअरमनही आहेत. या कारखान्यातील गरम ऊसाच्या रसाची टाकी फुटून आतापर्यंत 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते. मात्र आपल्याला अडवण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला. त्यावर पंकजा मुंडेंनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे.

press note

''अडवण्यात आलं हे वक्तव्य चुकीचं''

कुठल्याही अपघाताचं घटनास्थळ हे विविध तपासणीसाठी योग्य रहावे यासाठी सील ठेवणं आवश्यक असतं, मी स्वतः ,आमचे संचालक मंडळ आणि कार्यकर्ते जखमींच्या उपचारामध्ये व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पुढारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन फोटो काढत असल्याचं आढळलं.

तपासणीला यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता वाटल्याने घटनास्थळावर तपासणी अधिकारी आणि संबंधित वगळता कोणीही जाऊ नये, हा योग्य निर्णय घेऊन आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होतं, त्यावर पोलिसांनी कारवाई करणं योग्यच होतं.

या निवेदनात कोणत्याही व्यक्तीचं नाव अधोरेखित केलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला रोखण्यात आल्याचं धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. शिवाय रोखण्याऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अधिवेशनात बघून घेऊ, अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेनंतर गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द


पंकजा मुंडेंच्या कारखान्यात जाण्यापासून धनंजय मुंडेंना रोखलं

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: police stopped dhananjay munde in vaidyanath factory was not wrong says pankaja munde
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV