मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित

शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.

मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचं शनिवारी निलंबन करण्यात आलं.

रमेश शिंदे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.

त्यानंतर शिंदे यांच्या मोबाईलवरुन संबंधीत मेसेज व्हायरल झाल्याचं आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र एका राजकीय नेत्याच्या अंगरक्षकाने पंतप्रधानांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण व्हायरल केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात आतापर्यंत सोशल मीडियावर लिखाण करणार्‍यांना नोटिसा आल्या आहेत. मात्र एखाद्या सरकारी व्यक्तीच्या निलंबनाची कदाचित ही पहिलीच घटना आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV