औरंगाबादमधील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना घरात अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबादच्या आपत भालगावमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं.

औरंगाबादमधील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश

औरंगाबाद : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना घरात अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबादच्या आपत भालगावमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं.

एका जागरूक महिलेनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गर्भपात केंद्रावर छापा टाकला. यावेळी वैद्यकीय पदवी नसलेली महिला सर्रास गर्भपात करत असल्याचं पोलिसांच्या चौकशीदरम्यान उघड झालं.

पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं असून, ललिता खाडे असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.

तसंच गर्भपातासाठी तक्रारदार महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या सासू-सासऱ्यांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: illegal abortion center seized in
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV