पूजेसाठी पाणी आणायला गेलेला पुजारी नदीत बुडाला!

प्रशासनाकडून अजूनही तपासासाठी विशेष हालचाली केल्या जात नसल्याने गावकरी नाराज आहेत.

पूजेसाठी पाणी आणायला गेलेला पुजारी नदीत बुडाला!

मंगळवेढा (सोलापूर) : पूजेसाठी पाणी आणायला गेलेला पुजारी नदीत बुडाल्याची घटना मंगळवेढ्यात घडली आहे. पाय घसरुन पडलेल्या पुजाऱ्याचा अजून शोध सुरु आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अरळी येथील ग्रामदैवत असलेल्या नरसिंह मंदिरातील पुजारी अशोक हे पूजेसाठी नदीत पाणी आणायला गेले होते. त्यावेळी अशोक यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले.

अशोक पुजारी हे रोज पूजेसाठी भीमा नदीतून पाणी आणून पूजा करीत असत. आजही ते नित्यनियमाप्रमाणे नदीतून पाणी आणायला गेले. त्यावेळी पाय घसरून ते पाण्यात पडले.

सध्या भीमेला भरपूर पाणी असून शेजारी असलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा मोठा फुगवटा तयार झाला आहे. पुजारी पाण्यात बुडाल्याचे समजताच गावकऱ्यांनी लगेचच शोधकार्य सुरु केले असले, तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, प्रशासनाकडून अजूनही तपासासाठी विशेष हालचाली केल्या जात नसल्याने गावकरी नाराज आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV