सांगली मनपा क्षेत्रातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरीक त्रस्त, आयुक्तांना अल्टीमेटम

सांगली मनपा क्षेत्रातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरीक त्रस्त, आयुक्तांना अल्टीमेटम

सांगली : पावसाळा सुरु होताच सांगलीतले रस्ते खड्ड्यात गेल्याचं दिसून येतं आहे. सांगली, मिरज, कुपवाड या तिनही शहरात रस्त्ये खड्डेमय झाल्याने, संतप्त नागरिकांनी आयुक्तांना अल्टीमेटम दिला आहे. खड्डे बुजवले नाहीत तर लोकसहभागातून खड्डे बुजवण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्यावर्षी पावसात रस्त्यांची चाळण झाल्यानंतर पालिकेकडून यंदा चांगले रस्ते देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र वर्षभर टाळाटाळ केल्यानंतर पालिकेनं पावसाच्या तोंडावर रस्त्यांची कामं काढली. आणि त्याआधीच आलेल्या पावसानं रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण झालीय.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी खड्डेमय रस्त्याचा फटका मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांना बसला होता. सुरेश खाडे यांच्या इंग्लिश मीडियम स्कूलची बस खड्ड्यात आडकली होती. यावेळी बसमध्ये विद्यार्थी नसल्याने, मोठी दुर्घटना टळली.

रस्त्यांच्या दुरवस्थेने सांगली महापालिकेतील नागरिक त्रस्त आहेत. शहरातील शिवाजी मंडई, बसस्थानक, राममंदिर चौक, काँग्रेस कमिटी, आमराई रोड, पटेल चौक असे कित्येक रस्ते खड्ड्यात गेले आहेत.

रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे खासगी वाहनचालकांसह रिक्षाचालक, एसटी बसेस, परिवहन बसेसचे चालकही या खड्ड्यांना प्रचंड हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेला खड्डे बुजवणं जमत नसल्यास, लोकसहभागातून खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेखर माने यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

मिरजेत भाजप आमदाराच्या शाळेची स्कूलबस खचलेल्या रस्त्यात अडकली

First Published:

Related Stories

राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!

पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे

पालघरमध्ये शिक्षकाचा दारु पिऊन शाळेसमोरच धिंगाणा
पालघरमध्ये शिक्षकाचा दारु पिऊन शाळेसमोरच धिंगाणा

पालघर : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं दारु

40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या : उद्धव ठाकरे
40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या : उद्धव ठाकरे

औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत

7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'
7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'

ठाणे: पेट्रोल पंपांवर हातचलाखी करुन मापात पाप करणाऱ्यांवर ठाणे

फीलिंग पीसफुल.. मृत्यूच्या तासभर आधी 'ती' फेसबुक पोस्ट
फीलिंग पीसफुल.. मृत्यूच्या तासभर आधी 'ती' फेसबुक पोस्ट

जम्मू काश्मिर : पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मिर… आणि त्या स्वर्गाला चार

सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये...

सांगली : हरिपूर गावामध्ये भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या

कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु
कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु

कोल्हापूर: कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण

महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी
महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव बदलून ते अंबाबाई

माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश
माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश

माणगाव: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंडनजीकच्या