औरंगाबादेत प्रहार संघटनेची तोडफोड, गटविकास अधिकाऱ्यांनाही मारहाण

औरंगाबादेत पंचायत समितीच्या कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे.

औरंगाबादेत प्रहार संघटनेची तोडफोड, गटविकास अधिकाऱ्यांनाही मारहाण

औरंगाबाद : औरंगाबादेत पंचायत समितीच्या कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे.

ग्रामसेवक गैरहजर असल्यानं ही मारहाण केल्याचं समजतं आहे. मारहाणीसोबतच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गट विकास अधिकारी कार्यालयाचीही तोडफोड केली आहे.

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिथं असणाऱ्या खुर्चांही त्यांनी इतरत्र फेकल्या. तसंच बीडीओ एम. सी. राठोड यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: prahar sanghatana todfod in aurangabad latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV