विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया शनीच्या चरणी लीन

गेल्या काही काळापासून राजकीय कारकिर्दीला साडेसाती लागलेल्या प्रवीण तोगडियांनी आज शनीशिंगणापूर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया शनीच्या चरणी लीन

शनीशिंगणापूर : गेल्या काही काळापासून राजकीय कारकिर्दीला साडेसाती लागलेल्या प्रवीण तोगडियांनी आज शनीशिंगणापूर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी तोगडिया यांनी शनीला तेलाचा अभिषेक घालून पूजाही केली.

गेल्या काही काळापासून प्रवीण तोगडीया हे सतत भाजप आणि मोदींवर टीका करताना दिसत आहेत. राम मंदिराच्या प्रश्नावरुन त्यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे. मात्र, यामुळं ते मुख्य राजकारणातून बाजूलाच पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. साडेसातीचं विघ्न टाळण्यासाठी तोगडिया शनीच्या चरणी लीन झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, यावेळी तोगडिया त्यांच्याबरोबर राज्यातील विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्तेही उपस्थित होते. शनी देवस्थानच्या वतीनं यावेळी तोगडिया यांचा सन्मानही करण्यात आला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pravin Togadia in Shani Shingnapur for shani darshan latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV