सोलापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन सुरुच, जाळपोळीचा प्रयत्न फसला

अकलुज-सोलापूर ही एसटी पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिस वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

सोलापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन सुरुच, जाळपोळीचा प्रयत्न फसला

सोलापूर : ऊसदरासाठी शेतकऱ्यांचं सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरु आहे. पंढरपूर आणि अकलुज तालुक्यात या आंदोलनाने तीव्र रुप घेतलं. पंढरपूर तालुक्यातील बंडीचे गाव इथे अकलुज-सोलापूर ही एसटी पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिस वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

आंदोलकांनी बसच्या काचा फोडून आत पेट्रोल ओतलं. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवलं. ऊसाला 2700 रुपये पहिली उचल देण्याची मागणी आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याबाहेरही आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान नेते आणि कारखानदार यांची अभद्र युती असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला. यांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी ऊस कर्नाटकातल्या कारखान्यांना पाठवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन रविकांत तुपकर यांनी ही माहिती दिली. खासदार राजू शेट्टी हे देखील सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरात लवकर कोल्हापूर, सांगली, साताऱ्याप्रमाणे सोलापूरचा ऊस दर प्रश्न मार्गी लावा, अन्यथा अहमदनगरची पुनरावृत्ती सोलापुरात होईल, असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: protest for sugar cane rate in Solapur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV