सांगली-सोलापुरात ऊस दर आंदोलन चिघळलं

ऊस दराबाबत सरकारशी बोलणी फिस्कटल्यानंतर आता राज्यभर ऊस आंदोलन चिघळत आहे. आज सकाळी आंदोलकांनी सोलापूरमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले, तर सांगलीत म्हैसाळमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायरच आंदोलकांनी पळवले.

सांगली-सोलापुरात ऊस दर आंदोलन चिघळलं

सोलापूर/ सांगली : ऊस दराबाबत सरकारशी बोलणी फिस्कटल्यानंतर आता राज्यभर ऊस आंदोलन चिघळत आहे. आज सकाळी आंदोलकांनी सोलापूरमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले, तर सांगलीत म्हैसाळमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायरच आंदोलकांनी पळवले.

ऊस दराबाबत सरकार आणि शेतकरी संघटनांमधील सुरु असलेली बोलणी गुरुवारी फिस्कटल्यानंतर, शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर-पुणे रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले. फॅबकेट शुगर फॅक्टरीकडे हा ट्रॅक्टर ऊस घेऊन निघाला होता.

तर दुसरीकडे सांगलीमध्ये ऊस आंदोलन चिघळलं आहे. म्हैसाळमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर पळवले.काल मध्यरात्री हा प्रकार करण्यात आला.

दरम्यान, जोपर्यंत ऊसाला टनामागं 3 हजार 500 रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

ऊस दरासंदर्भातली शेतकरी संघटना आणि सरकारमधली बैठक फिस्कटली

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sangli and Solapur farmers orgnisation on issue of sugarcane rate
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV