रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही : पाटील

खरंतर राज्यातले सर्व खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजवले जातील, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण बहुदा त्यांना आपलं टार्गेट गाठणं कठीण होत आहे.

रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही : पाटील

परभणी : रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. परभणीत पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.

पाऊस पडला की खड्डे पडतात. याआधीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे जास्त टिकतील असे रस्तेच बनले नाहीत. परिणामी हे खड्डे जुनेच असून नव्याने खड्डे पडले असं काही नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

खरंतर '15 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही,' अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण बहुदा त्यांना आपलं टार्गेट गाठणं कठीण होत आहे. त्यामुळेच त्यांनी खड्ड्यांचं खापर आधीच्या आघाडी सरकारवर फोडलं आहे.संबंधित बातम्या :

15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही : चंद्रकांत पाटील

‘तातडीने खड्डे बुजवा, अन्यथा हातात चाबूक घ्यावा लागेल’


महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!


10 फूट लांब, दीड फूट खोल… नवी मुंबईत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?


पुण्यातीलही रस्त्यांचे खड्डे ‘गोल गोल’


मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात


मोदी सरकारने बनवलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत : गडकरी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PWD minister Chandrakant Patil on potholes in states
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV