भगव्या दहशतवादप्रकरणी राहुल गांधी माफी मागणार नाहीत : शिवराज पाटील

भगवा दहशतवाद ही संज्ञा रुजवून काँग्रेसनं हिंदुत्ववादी नेत्यांची बदनामी केल्याचा आरोप भाजपनं केला. त्यामुळे काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली. तर त्याला काँग्रेसनेही उत्तर देत माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

भगव्या दहशतवादप्रकरणी राहुल गांधी माफी मागणार नाहीत : शिवराज पाटील

नवी दिल्ली : हैदराबादेतील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने अखेर 11 वर्षानंतर निकाल दिला आहे. यात सबळ पुराव्याअभावी स्वामी असीमानंद यांच्यासह 5 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये वादावादी सुरु झाली आहे. 'राहुल गांधी किंवा काँग्रेसमधील कुणीही भगव्या दहशवादाप्रकरणी माफी मागणार नाही.' अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे.

भगवा दहशतवाद ही संज्ञा रुजवून काँग्रेसनं हिंदुत्ववादी नेत्यांची बदनामी केल्याचा आरोप भाजपनं केला. त्यामुळे काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली. तर त्याला काँग्रेसनेही उत्तर देत माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

'राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा इतर कुणीही भगव्या दहशतवाद प्रकरणी माफी मागणार नाही.' अशा शब्दात शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भाजपला उत्तर दिलं.

भगवा दहशतवादाचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी माफी मागावी या भाजपच्या मागणीवर शिवराज पाटील म्हणाले की, 'अशी अनेक प्रकरणं आहेत की, ज्यासाठी भाजपने माफी मागायला हवी. राहुल गांधी यांनी नेमकी कशासाठी माफी मागायला हवी? त्यांच्या घरातील तीन-तीन जणांचे खून झाले. पण तरीही त्यांनी कोणावर आरोप केले नाही.'

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rahul gandhi will not apologize says shivraj patil latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV