नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील रुफटॉप हॉटेलवर छापेमारी

मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर काल (रविवार) रात्री धाड टाकण्यात आली आहे. या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नसताना याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होतं.

By: | Last Updated: 05 Feb 2018 12:12 PM
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील रुफटॉप हॉटेलवर छापेमारी

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर काल (रविवार) रात्री धाड टाकण्यात आली आहे. या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नसताना याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होतं.

ज्यावेळी धाड टाकली गेली, त्यावेळी अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आले.  धरमपेठ भागात असणाऱ्या या हॉटेलचं नाव ‘रुफ नाईन’ असं आहे.

हा परिसर अतिशय व्हीव्हीआयपी मानला जातो.  महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच अनधिकृतपणे हॉटेल कुणाच्या आशीर्वादानं उभं राहिलं? हा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत.

दरम्यान, या हॉटेलमधील एक पुरुष कर्मचारी आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Raiding the Rooftop Hotel near the house of Chief Minister in Nagpur latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV