मुंबई-गोवा हाययेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ ट्रक आणि मिनीडोअर रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

मुंबई-गोवा हाययेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडनजीक आज भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तर सात जण जखमी झाले आहेत.

पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ ट्रक आणि मिनीडोअर रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात मुझफ्फर येलुकर, नीलम कांबळे, नमीबाई जाधव, सोहम जाधव या चौघांसह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर दशरथ सुतार, देवांश चाळके, अनिता गणपत पवार, इंदू तळेकर, गीता चाळके, रुद्र चव्हाण, संतोष कोळेक अशी जखमींची नावं आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV